
Maharashtra Weather Update
Pune News
ऑगस्ट महिना संपत आला तरी राज्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पण आता राज्यातील पाऊस दिलासा देण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि कोकणतील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे
हवामान खात्याने विदर्भ आणि कोकणात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदीया तसेच गडचिरोली जिल्ह्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला. तसेच विदर्भातील इतर भागांमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. राज्याच्या इतर भागात ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यात मागील काही दिवसांपासून ऊन सावल्यांचा खेळ सुरु आहे. पण राज्यात जोरदार पाऊस होताना दिसत नाही. उद्याही राज्यातील काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. पण सर्वदूर पावसाचा शक्यता नाही.
Share your comments