1. हवामान

Heavy Rainfall! पावसाचा जोर वाढला; या जिल्ह्यांना पुन्हा अलर्ट जारी

राज्यात जूनमध्ये पवसाच प्रमाण खूप कमी होते. जवळपास नव्हताच परंतु आता जुलै महिन्यात पावसाने थैमान घातले आहे. जुलै महिन्यात मात्र चांगलाच बॅटिंग करत आहे.

Rain increased

Rain increased

राज्यात जूनमध्ये पावसाच प्रमाण खूप कमी होते. जवळपास नव्हताच परंतु आता जुलै महिन्यात पावसाने थैमान घातले आहे. जुलै महिन्यात मात्र चांगलाच बॅटिंग करत आहे.

गुजरात, आसाम, उत्तराखंडमध्येही पावसाने चांगलाच जोर धरला आहे. राज्यांत काही दिवसांपूर्वी विश्रांती घेतलेल्या या पावसाने थोडासा दिलासा दिला होता. आता मात्र पुन्हा हवामान खात्याकडून मुसळधार पावसाची (Heavy Rainfall) शक्यता वर्तवण्यात येत आहे. अनेक धरण 100 टक्के प्रवाहाने भरून वाहत आहेत.

महाराष्ट्रासह इतर सहा राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. रविवारी विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसानंतर विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान खात्याकडून यलो अर्लट (Yellow Alert) जाहीर करण्यात आला आहे. विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली येथे प्रचंड पाऊस झाला आहे. उत्तर कोकणातील पालघर, नाशिक जिल्ह्यामधील घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे.

हे ही वाचा 
PM KISAN! आनंदाची बातमी; आता पीएम किसान योजनेचा हप्ता येणार 4,000 रुपये

काल 25 जुलै रोजी पूर्व विदर्भातील आणि मराठवाड्यातील अकोला,नागपूर, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली आहे. आज उत्तर कोकणासह मराठवाडा, विदर्भातील घाट संकुलातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने (Meteorological Department) व्यक्त केली आहे. पालघर, नाशिक, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हे ही वाचा 
Onion Prices: कांद्याच्या किमतीबाबद सरकारचं मोठं पाऊल; घेतला 'हा' निर्णय

गुजरात राज्यांत मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट (red alert) जारी करण्यात आला आहे. सूरत, नवसारी, वलसाड आणि डांग, तापी येथे पावसाची संततधार चालुच आहे. उत्तर प्रदेश, बिहारमध्येही पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे सध्या नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या 
Arvind Kejriwal: दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा: पुढील 5 वर्षात 20 लाख नोकऱ्या दिल्या जाणार
MonkeyPox: जगभरात मंकीपाॅक्स विषाणूचे थैमान; जाणून घ्या मंकीपाॅक्सची लक्षणे
Gas Cylinder! घरगुती गॅसच्या किमतीत मोठा बदल; जाणून घ्या आजच्या किंमती

English Summary: Rain increased Again alert districts Published on: 25 July 2022, 10:16 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters