Rain Update : राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात, 'या 'भागाला यलो अलर्ट
मागील आठ दिवसांपासून पावसाने राज्यात विश्रांती दिली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. त्यातच काही पिकांना आता पाण्याची गरज आहे. ऑगस्टच्या दुसरा आठवडा उजाडला तरी राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात अद्यापही वाढ झाली नाही.
राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती दिल्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. तसंच हवामान खात्याने खानदेश आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना तुरकळ ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे.
आज खानदेशातील नाशिक, जळगाव, मराठवड्यातील जालना, छत्रपती संभाजी नगर, परभणी, हिंगोली जिल्ह्यासह विदर्भातील अमरावती, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांना ढगांच्या गडगडासह पावसाचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट जारी केला आहे.
मागील आठ दिवसांपासून पावसाने राज्यात विश्रांती दिली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. त्यातच काही पिकांना आता पाण्याची गरज आहे. ऑगस्टच्या दुसरा आठवडा उजाडला तरी राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात अद्यापही वाढ झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आता आकाशाकडे लागले आहेत.
English Summary: Rain has started again in the statePublished on: 15 August 2023, 04:35 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments