कोल्हापूर
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे. मात्र मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास ८३ बंधारे पाण्याखाली गेले होते. पण पावसाच्या उघडीपीनंतरही अद्यापही १७ बंधारे पाण्याखाली आहेत.
आंबेओहळ मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. यामुळे उत्तर आणि गडहिंग्लज परिसरातील पिण्याच्या पाण्याची आणि शेतीच्या सिंचनाची चिंता मिटली आहे. आजरा तालुक्यातील चित्री प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे.
मागील दोन दिवसांपासून पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. त्यामुळे पंचगंगेची पाणीपातळी २८ फूट ६ इंचावर स्थिर आहे. तर पंचगंगेच्या पाणीपातळी हळूहळू घट होऊ लागली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
२४ तासांत जिल्ह्यात किती झाला पाऊस? (मिमिमध्ये)
मागील २४ तासांत जिल्ह्यातील कोणत्या भागात किती पाऊस झाला याची आकडेवारी पुढीलप्रमाणे - पन्हाळा- ७.८, शाहूवाडी-८.९, राधानगरी-९.९, गगनबावडा-२२.६, करवीर-५.८, कागल-५, गडहिंग्लज- २.६, भुदरगड- १२.६, आजरा- ६, चंदगड- ५.३, हातकणंगले-४.१, शिरोळ -२.८ मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.
Share your comments