Rain Alrt: राज्यात पावसाचा (Rain) दुसऱ्या टप्प्यातील प्रवास सुरु आहे. अनेक जिल्ह्यांत पहिल्या टप्प्यातील पावसाने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. तर आता दुसऱ्या टप्प्यातील पाऊसही मुसळधार (Heavy Rain) कोसळत आहे. अजूनही पाऊस कोसळतच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने (Meteorological Department) वर्तवला आहे.
महाराष्ट्रात (Maharashtra) या आठवड्यातही पावसाचा जोर कायम राहणार आहे. या आठवड्यात महाराष्ट्राच्या विविध भागात हलक्या ते मध्यम स्थितीचा अंदाज हवामान केंद्र मुंबईने (Meteorological Center Mumbai) वर्तवला आहे.
अशा स्थितीत हवामान खात्याने सोमवारी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळमध्ये यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे.
LIC च्या या प्लॅनमध्ये तुम्ही 861 रुपये गुंतवल्यास तुम्हाला मिळतील 540000 रुपये
बुधवारी धुळे, नंदुरबार, नाशिक, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा येथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बुधवारी अहमदनगर, पुणे, सातारा, जालना, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद येथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दुसरीकडे, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबादमध्ये गुरुवारसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शुक्रवार आणि शनिवारीही असेच वातावरण राहील.
ज्यादा पैशाचे आमिष पडले महागात! शेतकऱ्यांची करोडोंची फसवणूक, शेतमाल घेऊन व्यापारी फरार
दुसरीकडे, राज्यातील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक बहुतांश शहरांमध्ये 'चांगल्या ते समाधानकारक' श्रेणीत नोंदवला जात आहे. या आठवड्यातही तो त्याच श्रेणीत राहण्याची अपेक्षा आहे. मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुण्यात आठवडाभर ढगाळ वातावरण राहील. गुरुवार आणि शुक्रवारी मध्यम पाऊस, तर शुक्रवार आणि शनिवारी मुसळधार पाऊस पडू शकतो. आठवड्याच्या अखेरीस कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या:
Today Horoscope: कुबेर ४ राशींच्या लोकांवर करणार धनाचा वर्षाव, या ३ राशींना मिळेल नोकरीत यश
दुखापत झाल्यावर कोणता प्राणी माणसांसारखा रडतो? जाणून घ्या UPSC मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं उत्तर
Share your comments