Rain Alert: राज्यात दुसऱ्या टप्प्यातील पावसाला (Rain) सुरुवात झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात (Vidarbha and Marathwada) मान्सूनच्या पावसाने (Monsoon Rain) अगोदरच धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे तेथील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच राज्यात पावसाने पुन्हा एकदा मुसळधार कोसळायला सुरुवात केली आहे.
या आठवड्यातही महाराष्ट्रात (Maharashtra) पावसाचा जोर कायम राहणार आहे. या आठवड्यात महाराष्ट्राच्या विविध भागात हलक्या ते मध्यम स्थितीचा अंदाज हवामान खात्याने (Department of Meteorology) वर्तवला आहे.
अशा स्थितीत हवामान खात्याने मंगळवारी धुळे, नंदुरबार, नाशिक, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा येथे पिवळा अलर्ट जारी केला आहे.
LIC ची खास योजना! मुलीच्या लग्नावर मिळणार 27 लाख रुपये
बुधवारी अहमदनगर, पुणे, सातारा, जालना, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद येथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबादमध्ये गुरुवारसाठी यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे.
शुक्रवार आणि शनिवारीही असेच वातावरण राहील. दुसरीकडे, राज्यातील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक बहुतांश शहरांमध्ये चांगल्या ते समाधानकारक श्रेणीत नोंदवला जात आहे. या आठवड्यातही तो त्याच श्रेणीत राहण्याची अपेक्षा आहे.
मोठी बातमी! संजय राऊतांबाबत कोर्टाने घेतला मोठा निर्णय...
पुण्यात आठवडाभर ढगाळ वातावरण राहील. गुरुवार आणि शुक्रवारी मध्यम पाऊस, तर शुक्रवार आणि शनिवारी मुसळधार पाऊस पडू शकतो. आठवड्याच्या अखेरीस कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या:
शिंदे सरकार जनतेला देणार झटका! वीज दरात वाढ होण्याची शक्यता
Rain Alert: राज्यात मुसळधार पावसाचा जोर वाढणार! या जिल्ह्यांना अलर्ट जारी
Share your comments