Rain Alert : देशातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. उत्तर भारतामध्ये सध्या तापमानात काही अंशाने वाढ झाल्याची माहिती मिळाली आहे. तर, फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील काही भागांमध्ये अचानक थंडीत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे पंजाब, उत्तराखंड, आणि हिमाचल प्रदेशातील काही भागांमध्ये धुक्याची चादर पसरलेली दिसत आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, फेब्रुवारी महिन्यामध्ये पश्चिम भारतातील काही भागांमध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तर भारताच्या पूर्वेकडे वातावरण स्थिर राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. देशाच्या दक्षिण किनारपट्टी भागामध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकण किनारपट्टी भागात काही ठिकाणीहलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
IMD Alert : राज्यात पुन्हा हुडहुडी! या तारखेनंतर राज्यात गारठा वाढणार
जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमधील काही भागात वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव गेल्या दोन दिवसापासून वाढला आहे. त्यामुळे या भागात थंडी आणि धुके वाढले आहे. उत्तरेकडून राज्याकडे थंड वारे वाहत आहे. राज्यात पुन्हा एकदा थंडी वाढली आहे.
FD चे दर वाढले, आता महिला ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 'इतका' परतावा
पुण्यातील तापमान 10.30 अंश सेल्सिअसवर येऊन पोहोचले आहे. राज्यामध्ये पुढील आठ दिवस ही थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, या बदलत्या हवामानाचा परिणाम राज्यातील शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात होत आहे.
या वातावरणामुळे शेतीतील पिकांना धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर या वातारणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून सातत्याने केले जात आहे.
Love Horoscope: या राशींसाठी गुलाब दिवस खास असेल, जाणून घ्या प्रेम राशिभविष्य
Share your comments