1. हवामान

Panjabrao Dakh: 'काही ठिकाणी उघडीक; तर काही ठिकाणी मुसळधार', जाणून घ्या 22 ते 30 ऑगस्ट पर्यंतचा पंजाबराव डख यांचा अंदाज

Panjabrao Dakh: काही दिवसांपासून राज्यात पावसाने काही ठिकाणी जोर धरला आहे. तर काही ठिकाणी उघडीक घेतली आहे. काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस (Rain) बरसत आहे.

Punjabrao Dakh

Punjabrao Dakh

Panjabrao Dakh: काही दिवसांपासून राज्यात पावसाने काही ठिकाणी जोर धरला आहे. तर काही ठिकाणी उघडीक घेतली आहे. काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस (Rain) बरसत आहे.

पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) यांनी हवामान अंदाजासाठी आपली नवी ओळख निर्माण केली आहे. पंजाबराव डख यांचा सुधारित हवामान अंदाज आला आहे. पंजाबराव यांच्या अंदाजानुसार राज्यात आज आणि उद्या हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.

हे ही वाचा: IMD Alert: विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज; आज कुठे बरसणार पाऊस ?

22 ते 30 ऑगस्ट पर्यंतचा पंजाबराव डख यांचा अंदाज

22 तारखे नंतर राज्यात हवामानात (Monsoon News) मोठा बदल होणार असून 23 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट दरम्यान राज्यात पावसाची उघडीप राहणार असून राज्यात सर्वत्र सूर्य दर्शन राहणार आहे. 26 ऑगस्ट नंतर पुन्हा राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे.

27 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस हजेरी लावणार असल्याचे पंजाबराव यांनी सांगितले आहे. 27 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान बरसणारा पाऊस हा दक्षिण महाराष्ट्रात राहणार आहे.

हे ही वाचा: व्यवसाय करायचाय पण भांडवल नाही बोलणारांसाठी ही बातमी! आता शेळी पालनासाठी मिळणार 4 लाख रुपये...

राज्यात मागील महिन्यात झालेल्या पावसामुळे तसेच ऑगस्ट महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यात झालेल्या पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे शेतकरी बांधवांची खरीप हंगामातील पिके पाण्याखाली गेली होती. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

हे ही वाचा: LIC आधार शिला योजनेत फक्त 29 रुपये गुंतवा आणि मिळवा 4 लाखांचा रिटर्न; वाचा सविस्तर

English Summary: Punjabrao Dakh forecast from 22nd to 30th August Published on: 22 August 2022, 11:48 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters