Panjabrao Dakh: शेतकरी बांधव (Farmers) मोठ्या आतुरतेने पंजाबराव डख यांच्या (Panjabrao Dakh) मान्सून अंदाजाची वाट पाहत असतात. पंजाबराव डख यांचा सुधारित मान्सून अंदाज जाहीर केला आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार अशी भविष्यवाणी केली आहे.
शेतीचा खरीप हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळे शेतीकामाला वेग आला आहे. राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानकारक वातावरण आहे.
पंजाबराव यांच्या मते 8 ऑगस्ट पडणारा हा पाऊस सर्वदूर नसणार, म्हणजेच या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पण मोठा पाऊस पडणार असा अंदाज पंजाबराव (Panjabrao Dakh) यांनी वर्तवला आहे. मात्र असे असले तरी 8 ऑगस्ट पर्यंत राज्यात सर्वदूर हवामान कोरडे राहणार आहे.
पावसाची बातमी! पुढील ४ दिवस देशातील या भागात पडणार धो धो पाऊस; IMD चा इशारा
पंजाबरावांनी (Panjabrao Dakh News) वर्तवलेल्या सुधारित अंदाजानुसार, ३ ऑगस्ट पर्यंत राज्यात सूर्यदर्शन कायम राहणार आहे. पंजाबरावांनी शेतकरी बांधवांना 3 ऑगस्टपर्यंत शेतीची सर्व कामे उरकून घेण्याचा सल्ला दिला आहे.
३ ऑगस्ट पर्यंत राज्यात पावसाची उघडीप राहणार आहे. मात्र, त्यानंतर चार ऑगस्ट पासून ते आठ ऑगस्ट पर्यंत राज्यात सर्वदूर अतिशय मोठा पाऊस पडणार असल्याची शक्यता या वेळी पंजाबराव यांनी वर्तवला आहे.
पावसाचा जोर वाढणार! या राज्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस, IMD चा इशारा
पंजाबराव डख यांनी मान्सूनच्या अंदाजा समवेतच शेतकरी बांधवांसाठी एक मोलाचा सल्ला देखील दिला आहे. डक यांच्यामध्ये शेतकरी बांधवांनी पेरणी करण्यापूर्वी जमिनीची ओल तपासणे अतिशय महत्त्वाचे आहे.
Share your comments