Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने अनेक भागात हजेरी लावली आहे. हवामान विभागानेही २३ एप्रिल पासून ३० एप्रिल दरम्यान पुन्हा पाऊसाची शक्यता वर्तवली होती. आता आज पासून पुढील ४ दिवस महाराष्ट्रासाठी महत्वाचे असल्याचे बोलले जात आहे. पुढील ४८ तासात राज्यातील काही भागात विजा, वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीटही होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज (ता.२७) या दिवशी वादळी वाऱ्यासह पाऊस, विजा आणि गारपीट होण्याची संभावना पंजाबराव डख यांनी सांगितली आहे. हवामानात सतत होणाऱ्या बदलामुळे तापमानात चढ उतार पाहायला मिळत आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता असून त्यानंतर १५ मे नंतर थोड्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे तसेच मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात गारपीट होणार असून हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी झाडाच्या खाली उभे राहू असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांनी आपली गुरे शेतात न बांधता सुरक्षित ठिकाणी बांधावीत असंही सांगण्यात आले आहे.
पाव्हणं! भेंडवळची प्रसिद्ध भविष्यवाणी जाहीर; यंदा पाऊस पाणी कसं असणार, एकदा वाचाच...
कोंकण विभागात रायगड, रत्नागिरी, मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्रात धुळे, सातारा, जळगाव, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली या भागात येलो अलर्ट जारी करण्यात आले. मराठवाड्यात जालना, धाराशिव, बीड, लातूर, संभाजीनगर या भागातही अवकाळी पावसाचे प्रमाण आहे.
आयआयटी मुंबईतील पीएचडी राकेश अग्रवाल यांनी तयार केले चवीचे गोमूत्र, जाणून घ्या काय आहे खास
विदर्भातील बुलढाणा, वाशीम, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा,चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या भागात देखील येलो अलर्ट जारी करण्यात आले. तसेच इतर काही भागात गारपिटीची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहेत.
Share your comments