1. हवामान

Panjabrao Dakh : राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये येत्या आठवड्यात पाऊस पडण्याची शक्यता, पंजाबराव डख यांचा अंदाज

Panjabrao Dakh राज्यामध्ये सातत्याने वातावरणात बदल होताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यातच कमाल तापमानात मोठा बदल झालेला दिसून आला आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवायला लागल्या आहे. अशा परिस्थितीत राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

पाराजी आबासाहेब शिंदे
पाराजी आबासाहेब शिंदे
Panjabrao Dakh

Panjabrao Dakh

Panjabrao Dakh : राज्यामध्ये सातत्याने वातावरणात बदल होताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यातच कमाल तापमानात मोठा बदल झालेला दिसून आला आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवायला लागल्या आहे. अशा परिस्थितीत राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

पुढच्या महिन्यामध्ये राज्यातील काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार, 5 मार्चपासून नंदुरबार धुळे, जळगाव, अहमदनगर, शिर्डी, नाशिक, माजलगाव, शिरूर या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात 13व्या हप्त्या जमा! तुमच्या खात्यात पोहोचले की नाही? येथे तपासा

त्यामुळे शेतीतील रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या दोन्ही पिकांची लवकरात लवकर काढणी करून घेण्याचा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्याचबरोबर या कालावधीत पश्चिम विदर्भात आणि मराठवाड्यातील काही भागात देखील पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

म्हणजेच एकंदरीत 5 ते 10 मार्च दरम्यान महाराष्ट्रात बहुतांश भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता डख यांनी वर्तवली आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसणार आहे.

गळ्यात कांदा, कापसाची माळ घालून आंदोलन; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक

त्यामुळे सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. या बदलत्या वातावरणामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडण्याची शक्यता आहे.

त्यामुळे पाऊस येण्याच्या आधीच शेतकऱ्यांनी शेतीतील उर्वरित कामे उरकून घ्यावीत असे आवाहन डख यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी गहू हरभरा पिकांची लवकरात लवकर हार्वेस्टिंग करून शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, असे देखील डख यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

English Summary: Panjabrao Dakh : Chance of rain in the districts of the state in the coming weeks Published on: 28 February 2023, 04:12 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters