अभिषेक खेरडे, हवामान अभ्यासक
शेतकरी वर्ग मोठ्या आतुरतेने वाट बघत होते ती वेळ आली आहे. उद्यापासून (दि.6) राज्यातील पावसाचे प्रमाण वाढणार आहे. बंगालच्या उपसागर वर थोडं उशिरा का होईना पन आज पहाटेला कमी दाब निर्माण झाला. यामुळे पुढील 4-5 दिवस परत एकदा चांगला पाऊस बघायला मिळेल, या कमी दाबामुळे पुढील तीन दिवस राज्याच्या बहुतांश भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान अंदाजानुसार राज्यात बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. पण हा पाऊस सार्वत्रिक नव्हता. आता शेतकऱ्यांना सर्वत्र आणि जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. त्यामुळे आता अपेक्षित पाऊस होण्याची शक्यता आहे.
उद्या आणि परवा विदर्भातील वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच पश्चिम विदर्भात बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील. सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातही काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे.
गुरुवारी राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे. गुरुवारी संपूर्ण विदर्भ, संपूर्ण मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा,सांगली, नाशिक, नगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात. तर कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. येत्या दिवसात चांगला पाऊस राहील आणि बळीराजा सुखावेल असं चित्र दिसतं आहे.
Share your comments