Nagpur News :
नागपूर जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायत हद्दीमध्ये स्वयंचलित हवमान केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्यामुळे आता येथिल हवामानाचा, पावसाचा अंदाज गावातील सरपंच सांगणार आहेत. यामुळे गावातील दुष्काळाचा अंदाज आता सहज समजणे शक्य होणार आहे. तसंच शेतकऱ्यांचे दरवर्षी होणार पिकांचे नुकसान टाळण्यासाठी याची मदत होणार आहे.
स्कायमेटच्या महावेद प्रकल्पांतर्गत नागपूर जिल्ह्यामध्ये ७० स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आली आहे. ग्रामपंचायत हद्दीत ही केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्यामुळे ८ ते १० किलोमीटर पर्यंतचा अंदाज गावातील सरपंच देणार आहेत. या अंदाजाबाबत सरपंच यांना योग्य मार्गदर्शन देखील केलं जाणार आहे. सरपंच यांना प्राथमिक प्रशिक्षण दिल्यानंतर ते गावातील अंदाज सांगणार आहेत.
या हवामान केंद्रामुळे आज पाऊस पडणार आहे का? उद्या पाऊस पडणार आहे का? त्याबाबची इतबूंत माहिती मिळणार आहे. या केंद्रावर सोलर प्लेट देखील बसवण्यात आली आहे. पावसाचा अचूक अंदाज घेण्यासाठी जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायत हद्दीत हे स्वयंचलित केंद्र उभारण्यात आले आहे. तसंच दरवर्षी पाऊस किती पडेल? याचा अंदाज शेतकऱ्यांना फारसा येत नाही. त्यामुळे पेरणीची वेळ चुकते आणि बऱ्याचदा शेतकऱ्यांचे नुकसान होते ते नुकसान टाळता येईल त्यासाठी अशा प्रकारचे ऑटोमॅटिक वेदर स्टेशन उभारण्यात आले आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पावसाचा अंदाज बदला आहे. एका गावात मुसळाधार पाऊस पडतो, तर बाजूच्या २ किलोमीटर अंतरावरील गावात कडक ऊन असतं. यामुळे आता गावागावात लागलेल्या हवामान केंद्रामुळे त्या गावात पाऊस पडणार की नाही, याचा अचूक अंदाज घेता येणार आहे. त्यामुळे पावसाअभावी शेतकऱ्यांचे होणारं नुकसान कमी करणं शक्य आहे.
Share your comments