Panjabrao Dakh : राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. येत्या काही दिवसात राज्यात थंडीचा जोर वाढणार आहे असे हवामान विभागाने सांगितले आहे. पावसाने उघडीप घेतल्याने रब्बी हंगामातील कामांना वेग आला आहे.
पंजाबराव डख नोव्हेंबर महिन्यातला हवामान अंदाज वर्तवला आहे. पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या आपल्या नोव्हेंबर महिन्यातील सुधारित हवामान अंदाजानुसार राज्यात पावसाची पुढील पाच दिवस उघडीप राहणार आहे. मात्र दोन आणि तीन नोव्हेंबर रोजी राज्यात ढगाळ वातावरण बनणार आहे.
ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडणार आहे मात्र त्या कालावधीत पाऊस होणार नसल्याचे पंजाबराव यांचे म्हणणे आहे. एकंदरीत आता राज्यात पावसाची शक्यता नाही. दरम्यान पंजाबराव डख यांनी शेतकरी बांधवांना सल्ला देत रब्बी हंगामातील पेरणीसाठी तयारी सुरू करण्याचे आवाहन केले आहे.
या बाजारसमितीत कांद्याला मिळाला 5000 रुपयांचा भाव
पंजाबराव यांच्या मते शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामातील मुख्य पीक अर्थातच गव्हाची पेरणी सुरू करा हरभरा पिकाची देखील पेरणी सुरू केली पाहिजे. पंजाबराव यांच्या माहितीनुसार 20 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीत हरभरा पिकाची पेरणी केल्यास शेतकऱ्यांना निश्चितच दर्जेदार उत्पादन मिळणार आहे.
ब्रेकिंग: कोयना धरण परिसरात भूकंपाचे धक्के
पंजाबराव डख यांच्या मते, या कालावधीत हरभरा पिकाची पेरणी केल्यास उतारा अधिक मिळतो. साहजिकच यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडणार आहे. राज्यात सध्या पावसाची उघडीप आहे आणि हवामान कोरडा राहणार आहे.
दिवसा कडक ऊन आणि रात्रीत थंडीत देखील वाढ होणार आहे. यामुळे साहजिकच रब्बी हंगामातील पिकांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होत असल्याचे चित्र येणाऱ्या दिवसात दिसणार आहे.
Share your comments