पुणे
राज्यात जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला. विदर्भ आणि कोकणात जोरदार पाऊस झाला. तर काही भागात पूरस्थिती निर्माण झाली. राज्यातील धरणांमध्ये पावसामुळे समाधानकारक साठा होऊ लागला होता. मात्र ऑगस्टमध्ये पावसाने अचानक उघडीप दिली. त्यानंतर हवामान खात्याने राज्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला. पण आता शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.
राज्याच्या बहुतांशी भागांमध्ये ढगाळ वातावरण होते. पण अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळं शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसले आहेत. राज्यात पुढील पाच दिवस जोरदार पाऊस होणार नाही, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
मान्सूनचा नवीन अंदाज काय?
हवामान खात्याने पुन्हा एकदा नवीन अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे राज्यातील जनतेचे टेन्शन वाढले आहे. मान्सून आता उत्तरेकडे सरकला आहे. यामुळे सध्या राज्यात पावसाची कोणतीही परिस्थिती नाही. राज्यातील चार विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे हवामान विभागाच्या हवामान तज्ज्ञ यांनी व्यक्त केली आहे.
जून आणि जुलै महिन्यात चांगला राज्यात सरासरी एवढा पाऊस झाला. पण ऑगस्ट महिना सुरु होताच पावसाने चांगलीच उघडीप दिली. यामुळे गतवर्षी राज्यात पेरणी क्षेत्र कमी झाले आहे . धरणांमध्ये जलसाठा वाढला असला तरी गतवर्षी तुलनेत राज्यात पाणी कमी आहे. जर पाऊस झाला नाही. तर येणाऱ्या आगामी काळात पाणीटंचाईला सामोरे जाव लागण्याची शक्यता आहे. मागील वर्षाच्या तुलनेत पावसाची तूट आहे. यामुळे यंदा अल निनोचा प्रभाव आहे की काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे.
Share your comments