Monsoon Update: यावर्षी मान्सून (Monsoon News) तब्बल तीन दिवस लवकर म्हणजेच 29 मे ला केरळमध्ये दाखल झाला. केरळमध्ये मान्सून (Monsoon Rain) दाखल झाल्यानंतर कर्नाटकाच्या कारवारमध्ये मान्सून हा बराच काळ थांबला होता. मात्र तेथून मान्सूनचा प्रवास पुन्हा नव्या जोमात सुरू झाला आणि मानसून हा गोव्याच्या सीमाभागात थोडावेळ विश्रांतीसाठी थांबला. मात्र तदनंतर मान्सून वाऱ्याच्या वेगाने राज्यातील दक्षिण कोकणात म्हणजेच वेंगुर्ल्यात 10 जून रोजी दाखल झाला.
वेंगुर्ल्यात आल्यानंतर मान्सून या अवघ्या 24 तासांत मुंबई पायाखाली घातले. यामुळे मान्सून हा लवकरच राज्यातील इतर भागात दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला जाऊ लागला होता. मात्र आता मान्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापला असून जून महिन्यातील पंधरा दिवस जवळपास पावसाविना गेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड देखील वाढली आहे. शिवाय राज्यातील अनेक भागात उष्णतेचे प्रमाण वाढले असल्याने राज्यातील जनता उकाड्याने हैराण झाले आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, राज्यातील एकूण जिल्ह्यांपैकी 24 जिल्ह्यात जवळपास 50 ते 60 टक्के पाऊस हा कमी झाला आहे. ही आकडेवारी शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवत असून अजून काही काळ शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. आता विहिरीच्या पाण्याची पातळी देखील लक्षणीय कमी झाली असून अनेक धरणांनी तळ गाठला आहे. दरम्यान आता भारतीय हवामान विभागाकडून (IMD) मान्सून बाबत एक आनंद वार्ता समोर येत आहे.
मुंबई हवामान विभागाने वर्तवला नवीन अंदाजानुसार मान्सून लवकरच राज्यात पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे. मुंबई हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार मान्सून राज्यात 18 जून पासून पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे. शिवाय यामुळे राज्यातील विविध भागात मध्यम ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळणार आहे.
यामुळे मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या बळीराजाला पुन्हा एकदा दिलासा मिळाला असून आता पेरणीसाठी बळीराजाची लगबग देखील वाढली आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, मान्सून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात पोहचला आहे.
शिवाय आता मान्सून येत्या 18 तारखेपर्यंत विदर्भातील उर्वरीत भागात दाखल होणार असल्याचा अंदाज मुंबई हवामान विभागाने वर्तवला असल्याने शेतकऱ्यांच्या भुवया पुन्हा एकदा उंचावल्या आहेत. यादरम्यान कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पाउस पडेल, असं भाकित हवामान खात्याने वर्तवलं आहे. यामुळे निश्चितच शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला असून आता राज्यातील जनतेत आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे. दरम्यान राज्यातील अनेक भागात अजून पेरणीयोग्य पावसाची शेतकरी बांधव वाट पाहत आहे.
Share your comments