1. हवामान

Mansoon Breaking: हवामानात झाला मोठा बदल, महाराष्ट्राला पावसाचा इशारा

Mansoon 2022: यावर्षी मान्सून (Mansoon) हा वेळेआधीच केरळच्या सीमेत दाखल झाला होता. खरं पाहता, मान्सून (Mansoon Update) हा दरवर्षी 1 जूनला केरळमध्ये येतं असतो. मात्र या वर्षी मान्सून हा 29 मे ला केरळमध्ये दाखल झाला.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
Mansoon Rain

Mansoon Rain

Mansoon 2022: यावर्षी मान्सून (Mansoon) हा वेळेआधीच केरळच्या सीमेत दाखल झाला होता. खरं पाहता, मान्सून (Mansoon Update) हा दरवर्षी 1 जूनला केरळमध्ये येतं असतो. मात्र या वर्षी मान्सून हा 29 मे ला केरळमध्ये दाखल झाला.

मात्र त्या नंतर मान्सूनसाठी पोषक वातावरण न राहिल्याने मान्सूनला महाराष्ट्रात (Maharashtra) येण्यास आता नेहमीपेक्षा अधिक वेळ लागतं आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, मान्सून हा दरवर्षी 7 जुनच्या सुमारास महाराष्ट्रात प्रवेश करत असतो.

मात्र यावेळी मान्सूनच्या प्रवासात अडथळे येत असल्याने 7 जून उलटून देखील मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झालेले नाही. आता भारतीय हवामान विभागाच्या (IMD) सुधारित अंदाजानुसार मान्सून हा 11 जुनच्या सुमारास दक्षिण कोकणात म्हणजेच तळकोकणात दाखल होणार आहे.

त्यामुळे चातकाप्रमाणे मान्सूनची वाट पाहणाऱ्या बळीराजाच्या (Farmer) चेहऱ्यावर पुन्हा एकदा समाधान बघायला मिळत आहे. यादरम्यान 11 जून पर्यंत हवामानात मोठा बदल (Climate Change) होणार असून त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला पावसाचा इशारा देखील यावेळी भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) देण्यात आला आहे.

गेल्या 24 तासाच्या हवामानाचा जर विचार केला तर राज्यात गेल्या 24 तासात कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला आहे. मात्र मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान हे कोरडे असल्याचे सांगितले गेले आहे. दरम्यान गेल्या 24 तासात विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट देखील बघायला मिळाली.

विदर्भात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी वाढ देखील नमूद करण्यात आली आहे. मात्र, आता पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जनतेस तूर्तास आराम मिळणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांच्या देखील आशा पल्लवित होणार आहेत.

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आजपासून 11 जूनपर्यंत किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यादरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होणार असल्याचा अंदाज आहे. एवढेच नाही तर 12 जून नंतर विदर्भालाही हलक्या पावसाचा इशारा त्यावेळी भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

English Summary: Mansoon climate changed imd gave rain alert for maharashtra Published on: 08 June 2022, 09:48 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters