Weather Update : मान्सूनची वाट पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुढील २४ तासांत मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. रेमल चक्रीवादळामुळे मान्सूनला पोषक वातावरण तयार झाल्यामुळे मान्सून मजल लवकर मारली. सुरुवातीला ३१ मे ला मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पण आता पुढील २४ तासांत मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
मान्सून केरळमध्ये मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती कायम आहे. यामुळे पुढील ५ दिवसांत केरळमध्ये आणि अंदमान निकोबारमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यासोबतच अंदमान आणि निकोबार बेटांवर जोरदार पृष्ठभागाचे वारे वाहण्याची शक्यता आहे. १ जूनला तामिळनाडू आणि दक्षिण कर्नाटकमध्ये देखील पावसाचा अंदाज आहे.
सध्या मान्सूनला केरळमधून पुढे जाण्यासाठी परिस्थिती देखील अनुकूल होत आहे. तसंच दक्षिण अरबी समुद्राचा अधिक भाग, मालदीवचे उर्वरित भाग आणि कोमोरिन क्षेत्राचा देखील मान्सूनला पोषक वातावरण आहे. यामुळे मान्सूनची आगेकूच वेगाने होत आहे.
मेघालयातील एकाकी ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसासह अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, केरळ आणि काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आहे. यासह अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्ये विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम भागात देखील पावसाचा अंदाज आहे.
दरम्यान, हरियाणाच्या बहुतांश भागात उष्णतेची लाट आहे. चंदीगड-दिल्ली, पंजाब, पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेशच्या अनेक भागांमध्ये आण राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटेची परिस्थिती आहे. काल पश्चिम राजस्थानमधील चुरु येथे सर्वाधिक 50.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे.
Share your comments