Rain News :
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये दडी मारलेल्या पावसाने आज (दि.६) पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे पाण्याअभावी वाया जाणाऱ्या पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.
मराठवाड्याच्या अनेक भागात पावसाने दडी मारली होती. पण आज पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. अचानक पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांची काही काळ धांदल उडाली. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे.
उद्या आणि परवा छत्रपती संभाजी नगरसह मराठवाड्यातील लातूर, बीड, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली असून या जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. मागच्या दोन दिवसांपासून मराठवाड्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस होत आहे.
मराठवाड्यावर सध्या दुष्काळाच सावट आहे. या पावसामुळे नागरिकांना काहीसा सुकाळ मिळेल, असं चित्र आहे. तसंच पाण्याअभावी वाळण्याच्या मार्गावर असलेल्या पिकांना काहीसा दिलासा मिळेल. मात्र मराठवाड्यात अद्यापही चांगला पाऊस नाही. यामुळे आगामी काळात नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पावसाने दडी दिल्यामुळे हिरवीगार पिके जळून जाण्याच्या मार्गावर होती. पण दोन दिवसांपासून मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे. पावसाअभावी मराठवाड्याची परिस्थिती बिकट होत चालली होती. पावसाने दडी दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर पिके जळत चालली होती. मात्र पावसामुळे काही अंशी बळीराजा सुखावला आहे.
Share your comments