1. हवामान

Mansoon News: किनारपट्टी भागाला अति मुसळधार पावसाने झोडपले, मान्सूनचा अरबी समुद्रात प्रवेश

यावर्षी मान्सूनच्या प्रवासामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा न आल्यामुळे अंदमानातून सुरू झालेला मान्सूनचा प्रवास लवकरच केरळ मार्गे महाराष्ट्रात दाखल होईल असे एकंदरीत चित्र आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
mansoon will be coming in maharastra that guass of imd

mansoon will be coming in maharastra that guass of imd

 यावर्षी मान्सूनच्या प्रवासामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा न आल्यामुळे अंदमानातून सुरू झालेला मान्सूनचा प्रवास लवकरच केरळ मार्गे महाराष्ट्रात दाखल होईल असे एकंदरीत चित्र आहे.

यावर्षी तारखेच्या आधीच मान्सून अंदमानात आला आणि त्याचा प्रवासाला वेळ देखील मिळाला असून केरळमध्ये देखील पाऊस लवकर हजेरी लावत महाराष्ट्रात येण्यासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे. परंतु मान्सूनची सुरुवात होण्यापूर्वीच गेल्या काही दिवसांपासून केरळा मध्ये जोरदार पाऊस सुरु झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

येणाऱ्या आठवडाभर  केरळमध्ये पावसाची हीच परिस्थिती असेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच केरळमधील दहा जिल्ह्यांमध्ये येल्लो ऍलर्ट सांगण्यात आला असून इडुक्की जिल्हा प्रशासनाने पाण्याचा प्रवाह नियंत्रित ठेवण्यासाठी कल्लार कुट्टी आणि पंबला येथे बंधार्‍याचे दरवाजे खुले केले आहेत.

 महाराष्ट्रात केव्हा दाखल होऊ शकतो मान्सून?

 मान्सून आता अरबी समुद्र दाखल झाला असून पुढील दोन ते तीन दिवसात केरळ मध्ये पोहोचणार आहे. पाच जूनला कोकण आणि सात जूनला मुंबईत दाखल होईल.

 यावर्षी मान्सूनचा प्रवास समाधानकारक असल्यामुळे दहा जूनपर्यंत मुंबई पावसाला सुरुवात होते परंतु यावर्षी तीन ते नऊ जून दरम्यान मान्सून राज्यात आगमन करेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच 10 ते 16 जून दरम्यान मुसळधार पाऊस पडेल असा देखील इशारा हवामान खात्याने दिला आहे.

 महाराष्ट्रात पूर्व मोसमी पावसाचा जोर कमी

 बंगालचा उपसागर सोबतच अरबी समुद्रापर्यंत समाधानकारक वाटचाल करत  मोसमी वाऱ्यांनी शनिवारी मात्र दोन्ही समुद्रात कोणतीही प्रगती न करता विश्रांती घेतली आहे. महाराष्ट्र मध्ये देखील पूर्व मोसमी पावसाचा जोर कमी झाला असून पुढील तीन ते चार दिवस कोकण वगळताइतरत्र हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता हवामान विभागाने व्यक्त केली असून महाराष्ट्रात  गेली दोन-तीन दिवस पूर्व मोसमी  पाऊस झाला.

परंतु कोकणामध्ये 25 मे पर्यंत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून 25 मे नंतर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:अन्नधान्य उत्पादनात वाढ: कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने 'या' प्रमुख कृषी पिकांच्या उत्पादनाचा आगाऊ अंदाज केला जारी

नक्की वाचा:'या' केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तब्बल 14 टक्के वाढ आणि मिळणार 10 महिन्याची थकबाकी

नक्की वाचा:शेतकऱ्यांसाठी खूषखबर! नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या 'या' जिल्ह्यातील 77 हजार शेतकऱ्यांना मिळणार 50 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान

English Summary: mansoon will be coming in maharastra that guass of imd Published on: 22 May 2022, 10:27 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters