असनी चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात निर्माण झाले होते. परंतु आता हे वादळ शमले असून त्यानंतर मात्र कमी दाबाचे पट्टे तयार झाले आहेत.
या तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांची वाट सुकर झाली असून नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण अंदमान व बंगालच्या उपसागरात 15 मे रोजी दाखल होईल, असा दिलासादायक अंदाज भारतीय हवामानविभागाने गुरुवारी वर्तवला.जर इतर वर्षांचा विचार केला तर नैऋत्य मोसमी वारे अंदमानात दाखल व्हायला 18 ते 20 मे उजाडते. परंतु यावर्षी वातावरणीय परिस्थिती निवृत्ती मोसमी वाऱ्यांना अनुकूल असल्यामुळे हे वारे पाच दिवस आधीच येण्याची शक्यता आहे.
असनी चक्रीवादळाचा प्रभाव कमी
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले असनी चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्यानंतर बंगालचा उपसागर मध्ये बुधवारी कमी दाबाचा पट्टा तयार झाला. या कमी दाबाच्या पट्ट्याची चे 12 मे रोजी तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झाल्यामुळे आंध्र प्रदेश व रायल सीमा च्या किनारपट्टीवर पाऊस होत आहे व किनारपट्टीवर वाऱ्यांचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर आहे. या सगळ्या वातावरणीय घडामोडींमुळे नैऋत्य मोसमी वारे यांचे आगमन होण्यास सुकर वातावरण तयार झाल्यास मदत झाली आहे.
त्यामुळे यावर्षी हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजापेक्षा पाच दिवस आधीचनैऋत्य मोसमी वारे या भागात दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.त्यामुळे देशातील तामिळनाडू,तेलंगणा,कर्नाटक, केरळ, पुद्दुचेरी, नागालँड, मिझोराम आणि त्रिपुरा या भागात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच भारतातीलराजस्थान,गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली, महाराष्ट्रातील विदर्भ, हरियाणाया व इतर राज्यांमध्ये 16 मे पर्यंत उष्णतेची लाटेची तीव्रता कायम राहणार आहे.
तळकोकणात 27 मे ते दोन जून पर्यंत प्रवेश होण्याचा अंदाज
नैऋत्य मोसमी वारे केरळमध्ये 20 ते 26 मे पर्यंत दाखल होतील व तळकोकणात 27 मे ते 22 पर्यंत दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत ही माहिती दिली असून अंदमानात पाच दिवस आधी मोसमी वारे दाखल होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:तज्ञांचे मत:जून महिन्यातील कपाशीची लागवड करेल गुलाबी बोंड आळीच्या प्रादुर्भावास अटकाव
Share your comments