Mansoon Update: मान्सूनची (Mansoon) आतुरतेने वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माध्यमातून समोर येत आहे. भारतीय हवामान विभागाच्या (Indian Meteorological Department) मते मान्सूनने महाराष्ट्रात प्रवेश केला आहे.
मोसमी पावसाने (Mansoon Rain) कोकणात आपली हजेरी लावली असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने नुकतीच सार्वजनिक केले आहे. विभागाच्या मते, मान्सूनने आज 10 जून रोजी गोव्याची सरहद्द पार करत तळकोकणात म्हणजेचं दक्षिण कोकणातील वेंगुर्ल्यात आज प्रवेश नमूद केला आहे. त्यामुळे आगामी काही तासात दक्षिण कोकणात तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता देखील हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
मित्रांनो खरं पाहता या वर्षी मान्सून देशात म्हणजेचं केरळ मध्ये वेळे आधीच दाखल झाला. दरवर्षी 1 जूनला केरळमध्ये दाखल होणारा मान्सून यावर्षी 29 मे ला केरळमध्ये दाखल झाला. यामुळे राज्यात देखील मान्सून लवकर दाखल होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र दरवर्षी 7 जूनला दाखल होणारां मान्सून यावर्षी 7 जून उलटली तरी देखील राज्यात दाखल झाला नाही.
मान्सूनच्या प्रवासात अडथळा निर्माण झाला नाही वेळेआधी केरळ मध्ये दाखल झालेला मान्सून कर्नाटकात येऊन काही काळ विश्रांतीसाठी थांबला होता. त्या lनंतर मान्सूनने गोव्यापर्यंत प्रवास केला मात्र तिथून पुढे मान्सून प्रवासाला मोठा अडथळा निर्माण होत होता.
मात्र, कालं भारतीय हवामान विभागाने मान्सून साठी पोषक वातावरण तयार झाल्याचे सांगितले आणि लवकरच मान्सूनचा महाराष्ट्रात आगमन होणार असल्याचे भाकित वर्तवले होते. त्याअनुसार मान्सून आता तळकोकणात दाखल झाल्याचे भारतीय हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हवामान विभागानुसार, समुद्रातून येणाऱ्या बाष्यामुळे सध्या महाराष्ट्रातील कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रासह इतर भागांत पावसाला सुरुवात होणार आहे तर काही ठिकाणी पावसाला सुरुवात देखील झाली आहे.
आगामी काही तासात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. सध्या मान्सून महाराष्ट्रातील वेंगुर्लामध्ये दाखल झाला आहे आणि मान्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक वातावरण असल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Share your comments