Weather Update : उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे. तसंच उत्तरेकडील वारे महाराष्ट्रात वाहत असल्याने तापमानाचा पारा घटल्याने राज्यात गारठा जाणवत आहे. राज्यातील तापमान देखील मागील काही दिवसांपासून चढ-उतार पाहायला मिळत आहे. उत्तर भारतातील तापमान १० अंशांच्या खाली असल्याने थंडीचा अद्यापही कायम आहे.
उत्तर भारतातील वातावरणाचा परिणाम राज्यातील थंडीवर झाला आहे. यामुळे राज्यातील थंडीवर याचा देखील परिणाम झाला आहे. पुढील दोन ते तीन दिवस गारठा कायम राहणार आहे. मध्य आणि उत्तर महाराष्ट्र आणखी गारठणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
राज्यातच्या बहुतांश भागातील तापमान १० अंशांच्या खाली आहे. उर्वरित राज्यातही किमान तापमान १० ते १८ अंशांच्या घरात राहणार आहे. निफाड आणि धुळ्यामध्ये थंडीचा कडाका सर्वाधिक जाणवणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. मुंबई, नवी मुंबई, पालघर आणि कोकण पट्ट्यामध्येही पहाटेच्या वेळी धुकं आता पाहायला मिळत आहे.
दरम्यान, हरियाणा, पंजाब, चंदीगढ, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यांत धुक्याची चादर पसरलेली आहे. ज्यामुळं रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर याचे थेट परिणाम होताना दिसत आहे.
Share your comments