Weather News : राज्यातील हवामानात बदल झाल्याने अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत सापडले आहेत. तर दुसरीकडे नाशिकमधील काही भागात तापमान १० अंशांच्या खाली पाहायला मिळत आहे. तसंच काही भागात हवामान खात्याने थंडीचा अंदाज व्यक्त केला आहे.
उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे. यामुळे नागरिकांना या भागात अजूनही शेकोटीचा आधार घ्यावा लागत आहे. उत्तर प्रदेशात किमान तापमान ३ ते ५ अंशांदरम्यान तर, पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, राजस्थान आणि मध्य प्रदेशात ६ ते १० अंशांच्या दरम्यान आहे.
हवामानात बदल झाल्यामुळे काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मंगळवारी विदर्भातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरीसुद्धा लावली. या अवकाळीनं शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. २५ जानेवारी पर्यंत हा अवकाळी पावसाचा अंदाज कायम आहे. यामुळे शेतकरी आता चिंतातूर आहेत.
दरम्यान, महाराष्ट्राच्या काही भागात गारठा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राज्यात किमान तापमानाचा पारा १० ते १८ अंशांवर आहे. तर काही ठिकाणी पारा घसरला असल्याने गारठा वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. तापमानात घट झाल्यामुळे पुढील काही दिवस हा गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
Share your comments