Weather News : मान्सून अंदामानात दाखल झाला असून आता तो महाराष्ट्रात कधी दाखल होणार याची वाट सर्वचजण आतुरतेने पाहत आहे. सध्या राज्याच्या बहुतांश भागात अवकाळीचा पाऊस सुरु आहे. मे महिन्याच्या अखेरीच्या दिशेनं जाणारा हा आठवडाही राज्याच्या काही भागांसाठी पावसाचाच असणार आहे असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
याचबरोबर राज्यात सध्या सातत्याने वातावरण बदल आहे. यामुळे ऊन सावल्यांचा खेळ अनेक ठिकाणी बघायला मिळत आहे. तर कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, आणि सोसाट्याचा वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भात प्रामुख्यानं अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम आणि मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, जालना, लातूर, नांदेड या भागांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा, कोल्हापुरातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, अंदमान आणि निकोबारमध्ये मान्सून दाखल आहे. तसंच मान्सूनसाठी चांगले वातावरण आहे. तर ३१ मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. यादरम्य़ान तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल या भागांमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Share your comments