Weather News : हवामान विभागाच्या अंदाजानुसार आजपासून राज्यात पुन्हा गारठा वाढला आहे. आजपासून थंडी हळूहळू वाढत जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला तामिळनाडूच्या किनारपट्टीवर आलेल्या मंदोस चक्रीवादळाचा परिणाम वातावरणावर झाला होता. या चक्रीवादळामुळं राज्यात थंडी कमी झाली होती.
अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झालं होतं. तसेच काही ठिकाणी पाऊस देखील पडला होता. आता मात्र, मंदोस चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाला आहे.त्यामुळं पुन्हा राज्यात थंडी जाणवू लागली आहे. डिसेंबर महिन्यातील उर्वरित 10 दिवसात थंडीत चांगलीच वाढ होणार आहे.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात किमान तापमानात घट झाली आहे. सध्या राज्यातील मराठवाड्यासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र चांगलाच गारठला आहे. काही ठिकाणी तर तापमानाचा पारा 10 अंशाच्या खाली आल्यानं हुडहुडी चांगलीच वाढली आहे.
Ration Card: मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी सर्वात वाईट बातमी! आता...
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील किमान तापमानात मोठी घट झाली आहे. पाहुयात कोणत्या विभागात काय स्थिती आहे. ख्रिसमसनंतर म्हणजे 25 डिसेंबरनंतर मुंबईत थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
ख्रिसमसनंतर मुंबईत हिवाळा जाणवणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. सोबतच उर्वरित महाराष्ट्रात देखील तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज हवामान विभागान वर्तवला आहे. त्यामुळं राज्यात पुन्हा थंडीचा कडाका जाणवणार आहे.
7th Pay Commission: DA वाढीबाबत आली नवीन अपडेट, सरकार या तारखेपर्यंत चांगली बातमी देणार
Share your comments