1. हवामान

ऐन थंडीत 'या' ठिकाणी बरसणार पावसाच्या सरी, पाहा हवामान अंदाज

राज्यात सतत वातावरणात बदल होत आहे. कुठे थंडीचा कडका, तर कुठे ढगाळ वातावरण तयार झाले आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम थेट नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. त्याचबरोबर या वातावरणामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. अशात राज्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

weather forecast

weather forecast

राज्यात सतत वातावरणात बदल होत आहे. कुठे थंडीचा कडका, तर कुठे ढगाळ वातावरण तयार झाले आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम थेट नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. त्याचबरोबर या वातावरणामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. अशात राज्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात सध्या बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा 15 अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे. याचा परिणाम जनसामान्यांच्या जीवनावर होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी दाट धुके पडल्याचे चित्र समोर आले आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाले आहे.

याचा परिणाम थेट शेतीतील पिकांवर होत आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे. अशात हवामान खात्याकडून अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात थंडीची लाट पसरली आहे.

राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण; तर 'या' ठिकाणी पावसाची शक्यता

उत्तर भारतामध्ये थंडीचा जोर अधिकच वाढला आहे. अशात उत्तर भारतीयांसाठी हवामान खात्याने दिलासा देणारी माहिती दिली आहे. उत्तर भारतामध्ये 22 जानेवारीनंतर म्हणजेच आजपासून हवामानात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 23 ते 25 जानेवारी दरम्यान उत्तर भारतात वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांच्या पोरांची लग्नही जमत नाहीत; आयोगासमोर मांडली खदखद

उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, हरियाणा, पंजाब, दिल्ली या राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान, या बदलत्या वातावरणाचा परिणाम थेट नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. थंडीचा कडाका वाढल्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोट्यांची मदत घेत आहे.

वाढत्या थंडीमुळे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांच्या संख्येमध्ये देखील घट दिसून आली आहे. अशात लवकरच कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर देशासह राज्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

अर्थसंकल्पानंतर कर्मचाऱ्यांचा पगार 90 हजार रुपयांनी वाढणार, जाणून घ्या संपूर्ण हिशोब

English Summary: It will rain at this place in winter, see the weather forecast Published on: 22 January 2023, 10:37 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters