जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जो पाऊस झाला या पावसाने राज्यातील धरणे भरली त्यामुळे शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जवळजवळ मिटला आहे. आता जवळ जवळ राज्यातील बऱ्याच भागांमध्ये पावसाचा जोर ओसरला असून पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे.
परंतु तरीदेखील काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस अधूनमधून पडत आहे. परंतु आज विदर्भामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून बाकीच्या राज्यात उघडीप पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
नक्की वाचा:Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार! या जिल्ह्यांमध्ये कोसळणार धो धो पाऊस; अलर्ट जारी
वायव्य राजस्थान आणि पाकिस्तान या परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून त्याला लागूनच समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. मान्सूनचा आज असलेला कमी दाबाचा पट्टा कमी दाबाचे क्षेत्रापासून राजस्थान, सिकार,
सुलतानपूर, दिघा ते आग्नेय बंगालच्या उपसागरात पर्यंत कायम आहे.तसेच झारखंड आणि परिसरावर तसेच बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे वाहत आहेत व उत्तर अंतर्गत कर्नाटक पासून तामिळनाडू पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
नक्की वाचा:Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार! या जिल्ह्यांमध्ये कोसळणार धो धो पाऊस; अलर्ट जारी
राज्यामध्ये सध्या काही ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान असले तरी पावसाची मुख्यतः उघडीप असल्याचे चित्र आहे परंतु 1 सप्टेंबर पासून राज्यात पुन्हा पाऊस जोर धरेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना आज पावसाचा इशारा
महाराष्ट्रातील प्रामुख्याने विदर्भ विभागातील अकोला,वर्धा,अमरावती,नागपूर,चंद्रपुर,भंडारा,गोंदिया,बुलढाणा तसेच गडचिरोली या जिल्ह्यांना विजांसह पावसाचा इशारा म्हणजेच यलो अलर्ट विभागाकडून जारी करण्यात आला आहे.
Share your comments