जुलै महिन्याची सुरुवात झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाने हजेरी लावली. सगळीकडे पाणीच पाणी झाले धरणे देखील तुडूंब भरली. शेती पिकाचे देखील नुकसान झाले व हीच परिस्थिती या ऑगस्ट महिना सुरू झाल्यानंतर पावसाने केली.
परंतु आता गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाने थोडीफार उसंत घेतली असताना मात्र आता पुन्हा जोरदार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली
असून राज्यात पुढचे चार दिवस सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे या भागात अलर्ट जारी करण्यात आला असून नांदेड जिल्हात देखील पुढच्या चोवीस तासात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नक्की वाचा:देशातील या राज्यांमध्ये कोसळणार दुसऱ्या टप्प्यातील मुसळधार पाऊस; जाणून घ्या IMDचा इशारा
एवढेच नाही तर विदर्भातील काही जिल्ह्यात देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबाबत हवामान विभागाने माहिती दिली आहे की, 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत सातारा, पुणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला
असून सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भामध्ये आज आणि उद्या पाऊस होण्याची शक्यता असून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने ही स्थिती झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
नक्की वाचा:सावधान! या राज्यांना हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा; रेड अलर्ट जारी
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता
पश्चिम म्यानमार आणि लगतच्या परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्यामुळे उत्तर बंगालच्या उपसागरात आज कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊ शकते असे संकेत आहेत व उद्यापर्यंत ही जी काही प्रणाली आहे त्याची तीव्रता वाढण्याची देखील शक्यता आहे.
एवढेच नाही तर अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाले असून ते भारताचे किनाऱ्यापासून दूर पश्चिमेकडे जाणार आहे.
या जिल्ह्यांना विजांसह पावसाचा इशारा
बुलढाणा,अकोला,वर्धा, वाशिम, नागपूर, अमरावती, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
नक्की वाचा:हवामान खाते हतबल! हवामानातील बदल ठरत आहे अचूक अंदाज वर्तवण्यात अडचण, हवामान खात्याचा दावा
Share your comments