1. हवामान

IMD Alert: 'या' जिल्ह्यातील शेतकऱ्यांनो काळजी घ्या, पुढचे आठ दिवस कोसळणार धो धो पाऊस

सध्या मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या महिन्यामध्ये झालेल्या पावसामुळे अनेक शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे आणि बर्याच ठिकाणी जीवित आणि वित्त हानी देखील होऊन फार मोठे नुकसान झाले. त्यातच आता पुन्हा मान्सून सक्रिय झाल्या मुळे राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
heavy rain alert in some district in maharashtra

heavy rain alert in some district in maharashtra

सध्या मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या महिन्यामध्ये झालेल्या पावसामुळे अनेक शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे आणि बर्‍याच ठिकाणी जीवित आणि वित्त हानी देखील होऊन फार मोठे नुकसान झाले. त्यातच आता पुन्हा मान्सून सक्रिय झाल्या मुळे राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

हवामान खात्यानुसार राज्यात सर्वच भागात पुढील आठ दिवस पाऊस चांगलाच जोर धरणार असून पुणे, नासिक, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड आणि सातारा या जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. तसेच विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता आहे.

नक्की वाचा:IMD Alert: या राज्यांमध्ये धो धो पाऊस बरसणार! हवामान खात्याने दिला अति मुसळधार पावसाचा इशारा

या जिल्ह्यांना पाच दिवस यलो ॲलर्ट

 गोंदिया, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, नगर, वाशिम, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, जळगाव, धुळे, नंदुरबार, हिंगोली, लातूर, मुंबई, ठाणे आणि पालघर

 या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

 सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, रायगड आणि रत्नागिरी

 तळ कोकणामध्ये मान्सून पुन्हा सक्रिय

जर आपण तळकोकणचा विचार केला तर या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती.परंतु आता पावसाने दमदार हजेरी लावली असून सिँधुदुर्गात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे.

नक्की वाचा:IMD Alert: या राज्यांमध्ये धो धो पाऊस बरसणार! हवामान खात्याने दिला अति मुसळधार पावसाचा इशारा

त्यामुळे भातशेतीला दिलासा मिळाला असून बळीराजा देखील आनंददायी आहे. अरबी समुद्रामध्ये  कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पुढील चार दिवस कोकणात मुसळधार पाऊस कोसळणार असून रात्री पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच भागात पावसाची संततधार सुरू आहे.

 नागरिकांना आवाहन

 राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये चांगला पाऊस पडत असून सिंधुदुर्ग  जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे

त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले असून राज्यातील नद्या अनेक ठिकाणी धोक्याची पातळी गाठू शकतात त्यामुळे नदीच्या काठी राहणारे लोकांनी या सगळ्या कालावधीत अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. कारण नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.

नक्की वाचा:पावसाची बातमी! या राज्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस; IMD चा इशारा

English Summary: imd give alert to heavy rain in some eight district in maharashtra Published on: 06 August 2022, 08:09 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters