IMD Alert: राज्यात गेल्या आठ दिवसांपासून परतीच्या पावसाचा (Rain) धुमाकूळ पाहायला मिळत आहे. मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस मुसळधार (Heavy Rain) कोसळत आहे. संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे काढणीला आलेल्या खरीप पिकांचे (Kharip Crop) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अजूनही पाऊस कोसळणारच असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे.
मुंबईसह महाराष्ट्राच्या (Maharashtra) अनेक भागात सोमवारी पावसाची शक्यता आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता हवामान केंद्र मुंबईने पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बुलढाणा या भागांना इशारा दिला आहे. वाशिम आणि यवतमाळमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
त्याचबरोबर मंगळवारीही पावसाची शक्यता लक्षात घेता ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
शेतकऱ्यांनो प्रतीक्षा संपली! पीएम मोदी उद्या खात्यात जमा करणार 12 वा हप्ता, 16000 कोटी होणार खर्च
बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबादमध्ये यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. पाऊस आणि वेगवान वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
विविध ठिकाणी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे आणि गडगडाट होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले. दुसरीकडे, महाराष्ट्रातील हवेचा दर्जा निर्देशांक बहुतांश शहरांमध्ये 'चांगल्या ते समाधानकारक' श्रेणीत नोंदवला जात आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमधील हवामान
पुणे
पुण्यात कमाल तापमान 28 तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. हवेचा दर्जा निर्देशांक 'समाधानकारक' श्रेणीत 88 वर नोंदवला गेला.
मुंबई
सोमवारी मुंबईत कमाल तापमान 33 तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आकाश अंशतः ढगाळ राहील आणि एक किंवा दोनदा पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवेचा दर्जा निर्देशांक 'समाधानकारक' श्रेणीत 89 नोंदवला गेला.
दिवाळीपूर्वी सोने खरेदीदारांची लॉटरी; सोने ६,००० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवीनतम दर
औरंगाबाद
औरंगाबादमध्ये कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 21 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. एक किंवा दोनदा पाऊस किंवा ढगांच्या गडगडाटासह अंशतः ढगाळ वातावरण असेल. हवेचा दर्जा निर्देशांक 'समाधानकारक' श्रेणीत 96 आहे.
नाशिक
नाशिकमध्ये कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. आकाश अंशतः ढगाळ राहील आणि गडगडाट आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. हवेचा दर्जा निर्देशांक 'चांगल्या' श्रेणीत 44 आहे.
नागपूर
नागपुरात कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरण असेल आणि एक किंवा दोनदा पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. त्याच वेळी, हवा गुणवत्ता निर्देशांक 60 आहे, जो 'समाधानकारक' श्रेणीत येतो.
महत्वाच्या बातम्या:
राज्यातील केळी उत्पादक संकटात! वाढत्या रोगाचा प्रादुर्भाव पाहता उत्पादन घटण्याची शक्यता
तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर! पहा देशात कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग पेट्रोल डिझेल
Share your comments