IMD Alert: राज्यात मान्सूनची (Monsoon) जोरदार हजेरी पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनके भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. तसेच मान्सूनचे आता काही शेवटचे दिवस राहिले असल्याने पुन्हा एकदा जोरदार कोसळायला सुरुवात केली आहे.
ऑक्टोबरच्या सुरुवातीलाही देशाच्या अनेक भागात मान्सून सक्रिय आहे. बंगालच्या उपसागरावर (Bay of Bengal) चक्रीवादळ (Hurricane) निर्माण झाल्यामुळे नैऋत्य मान्सून (Southwest Monsoon) देशातून माघार घेण्यास थोडा विलंब होण्याची शक्यता आहे. पुण्यात (pune) शुक्रवारी झालेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचले होते. तसेच जोरदार वाऱ्यामुळे अनेक भागातील झाडेही पडली आहेत.
त्यामुळे ५ ऑक्टोबरपासून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, दिल्लीसह अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक भागात पावसामुळे अजूनही बिकट परिस्थिती आहे. मुसळधार पावसामुळे पुण्यात पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले.
केळी उत्पादकांनो सावधान! केळीवर घसा चोकिंग रोगाचा पादुर्भाव; करा उपाय अन्यथा मोठे नुकसान
ऑक्टोबरमध्ये कोणत्या राज्यात पाऊस पडणार
नोरू चक्रीवादळामुळे (Cyclone Noru) बंगालच्या उपसागरावर ईशान्य दिशेने तयार झालेले चक्रीवादळ मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशकडे सरकण्याची शक्यता आहे, त्यामुळे गंगेच्या मैदानात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या (IMD) मते, मान्सूनची माघार साधारणपणे 20 सप्टेंबरपासून सुरू होते.
परंतु उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील हवामान प्रणालीमुळे, यावेळी ते 13 ऑक्टोबरपर्यंत थांबू शकते. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, दिल्ली आणि हरियाणाच्या काही भागात ५ ऑक्टोबरपासून पावसाची शक्यता आहे.
युरिया-डीएपीपेक्षा स्वस्त आणि मस्त आहे हे खत; पिकांना ठरतंय वरदान
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने कालपासून पुन्हा पावसाला सुरुवात केली आहे. मुंबईसह ठाणे परिसरात पाऊस झाला. मात्र कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला.
आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रासाठी ‘यलो अलर्ट’ (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. सणासुदीच्या काळात राज्यात आता पुन्हा पाऊस पडत आहे. काल अनेक ठिकाणी पाऊस झाला. मुंबईतही काल हलका ते मध्यम पाऊस झाला.
आता पुढील चार दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच ठाणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या:
मत्स्य पालनाचा व्यवसाय सुरु करा आणि कमवा बक्कळ पैसा; व्यवसायावर मिळतेय बंपर सबसिडी
5G नेटवर्कचा शेतीला होणार मोठा फायदा! शेतकऱ्यांना मिळणार हवामानाची अचूक माहिती
Share your comments