IMD Alert : हवामानात सतत बदल होत आहेत. गेल्या महिन्यात राज्यात पावसाने उसंती घेतल्याने शेतकऱ्यांसह सर्वांनाच दिलासा मिळाला होता. मात्र आता ऐन थंडीत हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
13 आणि 14 नोंव्हेबरला मध्य महाराष्ट्र आणि कोकणच्या काही भागांत हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. मागच्या काही दोन दिवसापूर्वी बंगालच्या उपसागरातील वायव्य भागापासून श्रीलंकेच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्ट्याची स्थिती तयार झाली आहे. याचबरोबर पुढच्या 24 तासांत कमी दाबाच्या पट्ट्याची क्षमता वाढण्याची शक्यता आहे.
उद्या (दि.12) नोव्हेंबरला हा कमी दाबाचा पट्टा तमिळनाडू-पुद्दुचेरी किनारपट्टीवर धडकणार आहे. यामुळे दक्षिण भारतात पाऊस वाढणार आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, साताऱ्यासह पुण्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भ या भागांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
IFFCO’s Konatsu : पिकासाठी जबरदस्त ब्रॉड-स्पेक्ट्रम कीटकनाशक
राज्यात दिवसा ढगाळ वातावरण राहिल्यामुळे कमाल तापमानात वाढ होत आहे, तर रात्रीच्या वेळी किमान तापमानात वाढ होत आहे. मात्र, 13 आणि 14 नोंव्हेबरला मध्य महाराष्ट्र आणि कोकणच्या काही भागांत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
IMD नुसार, उत्तर किनारपट्टीवरील तामिळनाडू, पाँडेचेरी आणि कराईकल आणि लगतच्या भागात वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. तामिळनाडूच्या उत्तर भागात काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडेल.
11 नोव्हेंबर रोजी दक्षिण तामिळनाडूमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टी होणार आहे. मच्छिमारांना 11-12 नोव्हेंबर दरम्यान दक्षिण आंध्र प्रदेश-तामिळनाडू-पाँडेचेरी-श्रीलंका किनारे, मन्नारचे आखात आणि लगतच्या कोमोरिन भागात तसेच नैऋत्य आणि लगतच्या पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात जाऊ नये, असे सांगण्यात आले आहे.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! मागेल त्याला शेततळे योजना पुन्हा सुरु; अनुदानाच्या रकमेत वाढ
Share your comments