IMD Alert: गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या काही भागात जोरदार पाऊस पडत आहे. मात्र काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसत आहे. भारतीय हवामान खात्यानुसार पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे.
आज कुठे बरसणार पाऊस ?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 24 ते 48 तासांत मुंबई शहर आणि उपनगरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. IMD ने उत्तर कोकण, दक्षिण कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी येलो अलर्ट दिला आहे.
तसेच घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तसेच विजांच्या गडगडाटासह वादळी आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोकणात काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर विदर्भामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा: Corona Update: सावधान कोरोना पुन्हा येतोय! कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ
जनजीवन विस्कळीत
राज्यात जुलै पाठोपाठ ऑगस्ट महिन्यातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झालेली होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे विदर्भात पुन्हा जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.
राज्यातील अनेक भागात जुलै आणि ऑगस्टमध्ये आतापर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. चार महिन्यांच्या हंगामाला अजून दीड महिना बाकी असल्याने काही ठिकाणी हंगामी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
हे ही वाचा: PM Kisan Samman Yojana: 12 व्या हप्त्यात 'या' शेतकऱ्यांना मिळणार 4 हजार रुपये! जलद करा हे काम...
Use Fertilizers: शेतकरी मित्रांनो खते वापरताना 'या' गोष्टींची काळजी घ्या; अन्यथा होईल मोठे नुकसान
Share your comments