IMD Alert: देशात यंदा मान्सूनचा (Monsoon) पाऊस वेळेवर दाखल झाला होता. तसेच आता मान्सूनच्या पावसाचा (Monsoon Rain) परतीचा प्रवास सुरु झाला आहे. राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. तर धरणात शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
येत्या ३ दिवसांत आणखी मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. तसेच खरीप पिकांची काढणी केली असेल तर त्याची योग्य काळजी घेण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. विजांच्या कडकडासह राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मान्सून हळूहळू त्याच्या प्रस्थानाच्या दिशेने वाटचाल करत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या तीन ते चार दिवसांत वायव्य भारतातील काही भागांतून मान्सून निघू शकतो. दरम्यान, डोंगरावर पुन्हा एकदा बर्फवृष्टी सुरू झाली आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल, उत्तराखंडच्या डोंगराळ भागात हलकी बर्फवृष्टी सुरू झाली आहे.
१ ऑक्टोबरनंतर सर्वसामान्य ते शेतकऱ्यांना बसणार महागाईचा फटका! सीएनजी गॅस आणि खतांच्या किमती वाढणार
हवामान खात्यानुसार वाऱ्याच्या दिशेने बदल होण्याची शक्यता आहे. मात्र, अजूनही देशात अनेक ठिकाणी मान्सूनचा पाऊस सुरू आहे. या अनुषंगाने आजही अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने (IMD) व्यक्त केली आहे.
पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंडसह अनेक राज्यांमध्ये आजही मुसळधार पावसाचा अंदाज एमआयडीने वर्तवला आहे.खरे तर, उत्तर भारतातील मैदानी भागात मान्सूनचे वारे कमकुवत होऊ लागले आहेत आणि आता पश्चिमेकडील कोरडे वारे वाहू लागले आहेत.
महाराष्ट्रात SBI मध्ये 747 जागांची भरती तर पूर्ण भारतात 5000 हून अधिक जागा; असा करा अर्ज
दुसरीकडे, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, महाराष्ट्र (Maharashtra), तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ ही राज्ये पावसासाठी अनुकूल आहेत. यासोबतच ईशान्य भारतातील काही भागांमध्येही पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे.
हवामान खात्यानुसार, आज तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये पाऊस पडू शकतो. यासोबतच आज दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, आसाम, उत्तराखंड, मेघालय, अंदमान आणि निकोबारमध्ये पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे, कोस्टल आंध्र प्रदेश आणि यानाममध्ये 30 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
खाजगी हवामान अंदाज एजन्सी स्कायमेट हवामानानुसार, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर तेलंगणामध्ये एक किंवा दोन ठिकाणी जोरदार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो.
महत्वाच्या बातम्या:
नवरात्रीत सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी! 10 ग्रॅम सोने 6671 रुपयांनी स्वस्त
आनंद अँग्रो केअरच्या वर्धापन दिनानिमित्त शेतकरी मेळावा
Share your comments