IMD Alert: देशात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचे (Heavy Rain) सत्र सुरूच आहे. नवरात्री संपून आता दिवाळी काही दिवसांच्या तोंडावर आली आहे तरीही पावसाचा (Rain) धुमाकूळ सुरूच आहे. परतीचा मान्सून अजूनही अनेक राज्यांमध्ये सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे. आजही महाराष्ट्रासह (Maharashtra) अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याने (Meteorological Department) उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रासह 23 राज्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. उत्तर प्रदेशातील 45 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, सिक्कीम, बिहार, तेलंगणा, मध्य प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पावसाची ही फेरी आजही कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, सिक्कीम, बिहार, तेलंगणा, रायलसीमा, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी, पूर्व मध्य प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचवेळी मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि गोवा आदी ठिकाणी दिवसभर ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे.
चांगल्या उत्पादनासाठी देशी की हायब्रीड बियाणे? जाणून घ्या कोणते बियाणे दर्जेदार
तत्पूर्वी सोमवारी जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, दिल्ली एनसीआर, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक अंदमान आणि निकोबार बेटांच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला.
खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेट वेदरच्या (Skymet Weather) अंदाजानुसार, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, उप-हिमालय पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अंदमान आणि निकोबार बेटे, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, गंगा पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, छत्तीसगड, रायलसीमा, तामिळनाडू येथे हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुद्दुचेरी, कराईकल आणि अंतर्गत कर्नाटक.
ओडिशा, उत्तराखंड, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, कोकण, गोवा, किनारी आंध्र प्रदेश, यानम, तेलंगणा, किनारी कर्नाटक, केरळ, माहे आणि लक्षद्वीपमध्ये विखुरलेला पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख, पूर्व राजस्थान आणि गुजरातमध्ये विखुरलेला हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या:
महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये वाहनधारकांना फटका! पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ, पहा नवे दर...
सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण! सोने 5080 रुपयांनी स्वस्त; फटाफट चेक करा नवे दर
Share your comments