IMD Alert: गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. राज्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई (Mumbai), कोकणासह (Konkan) राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे.
या भागात मुसळधार पाऊसाचा इशारा
दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीभागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. यामुळे विदर्भात विजांच्या कडकडाटासह तीन दिवस मुसळधार पाऊस इशारा दिला आहे.
तर मराठवाडा भागात आज 12 सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आज 12 आणि उद्या 13 सप्टेंबर हे तीन दिवस सतर्कता बाळगण्याचं आवाहन हवामान विभागाने केलंय. (IMD Alert)
Panjabrao Dakh : राज्यातील या भागात पडणार मुसळधार पाऊस; पंजाबरावांचा इशारा
ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरासाठी पुढील पाच दिवस पावासाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Corona Vaccine: कोरोना रोखण्यासाठी चीनने आखला बिग प्लॅन; आता..
कोकणात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसाठी आजपासून पुढील तीन दिवस काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
Share your comments