Rain Update: हवामान विभागाने वर्तवलेल्या (Meteorological Department) अंदाजानुसार पाऊस पुन्हा एकदा जोरदार सक्रिय झाला आहे. राज्यातील काही भागात पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मुसळधार ते अतिमुसळधारची शक्यता
रात्रीपासून मुंबई आणि कोकणातील ( Mumbai Kokan ) बऱ्याच ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यातच आता मराठवाड्यात सुद्धा पुढील आठवडाभर जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
''गल्ली ते दिल्ली पावसाचा अंदाज"; 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा
मुसळधार पाऊस
उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नंदुरबार आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाट क्षेत्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
दि. 5 जुलै रोजी मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागात 30-40 किलोमीटर प्रतितास वेगाने वादळ वारा व वीजेच्या गडगडाटासह मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस तर दि. 6 व 7 जुलै दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गेली दोन आठवडे औरंगाबाद, बीड आणि जालना जिल्हा सोडला तर मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत होते. पण आता मात्र आठवडाभर विभागात दमदार पाऊस पडण्याची शक्यता, असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मूग, उडीद पिकाच्या पेरणीत दिवसेंदिवस होतेय घट; जाणून घ्या कारणं...
Share your comments