Maharashtra Weather Forecast :
बुधवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान खात्याने जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे. मागील एक महिन्यापासून राज्यात पावसाने विश्रांती दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या आहेत.
शेतकरी चांगल्या पावसाची वाट पाहत आहेत. पण आज (दि.२८) राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढला होता. आज काही ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. उद्या (दि.२९) रोजी पुणे, सातारा, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांमधील काही भागांमध्ये ठिकठिकाणी विजांसह हलक्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.
दरम्यान, बुधवारी मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, सोलापूर सांगली तर कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर राज्याच्या इतर भागात हलक्या ते मध्यम सरी पडतील, असाही अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
Share your comments