1. हवामान

Maharashtra Rain: महाराष्ट्रात २४ तासांपासून पावसाचे थैमान! ३ जणांचा मृत्यू; येत्या काही तासांत आणखी धो धो कोसळणार

Maharashtra Rain: राज्यात गेल्या २४ तासांपासून पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर काही भागात नद्यांना पूर आला आहे. तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येत्या काही तासांत आणखी पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

ऋषिकेश महादेव वाघ
ऋषिकेश महादेव वाघ
Heavy rain

Heavy rain

Maharashtra Rain: राज्यात गेल्या २४ तासांपासून पावसाने थैमान (Rain) घातले आहे. त्यामुळे अनेक भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर काही भागात नद्यांना पूर (Rivers flood) आला आहे. तसेच शेतीचे (loss of agriculture) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येत्या काही तासांत आणखी पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

महाराष्ट्रातील ठाणे शहरात पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. शनिवारी जनजीवन ठप्प झाले, या मोसमातील सर्वाधिक एकाच दिवसात 122.14 मिमी पाऊस झाला. पावसामुळे तिघांना जीव गमवावा लागला. त्याचबरोबर ठाणे शहरातील अनेक सखल भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख अविनाश सावंत म्हणाले की, शहरात या हंगामातील एकाच दिवसात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. आकडेवारीनुसार, ठाणे शहरात या हंगामात आतापर्यंत एकूण 2690.40 मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर गेल्या वर्षी याच कालावधीत 3164.27 मिमी पाऊस पडला होता.

उच्चशिक्षित तरुणाने नोकरीला ठोकला रामराम! देशी गायींचे गोमूत्र आणि दूध विकून करतोय करोडोंची कमाई

शहरातील विविध भागात पावसानंतर झाडे पडण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. तसेच सखल भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. भिवंडी शहरात पावसामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील हा सर्वाधिक बाधित भाग आहे.

पावसाने तिघांचा बळी घेतला

अग्निशमन अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष नगरमध्ये वीज कंपनीचा कर्मचारी चुकून नदीत पडला, तर शहरातील दिवानशाह दर्गा परिसरात गुलनाज अन्सारी ही पाच वर्षांची मुलगी नदीत वाहून गेली. याशिवाय तिसऱ्या घटनेत सोनाळे गावातील एका व्यक्तीचा खदानीत पडून बुडून मृत्यू झाला. 

पावसाने झाले पिकांचे नुकसान? तर काळजी करू नका, या सरकारी योजनेतून होईल भरपाई

हवामान खात्याच्या (IMD) ताज्या अपडेटनुसार, उत्तर भारतात वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय आहे. त्यामुळे मध्य प्रदेश आणि मध्य उत्तर प्रदेश लगतच्या भागात कमी दाबाचे केंद्र कायम राहिले आहे. हे कमी दाबाचे केंद्र येत्या २४ तासांत उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे.

त्यामुळे आसाम, बिहार, पूर्व उत्तर प्रदेशात पाऊस पडत आहे. विभागानुसार, 17 सप्टेंबर रोजी पश्चिम-पूर्व उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, गोवा, महाराष्ट्र, अंदमान निकोबार आणि कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडू शकतो.

महत्वाच्या बातम्या:
हिरोने केली दमदार नवीन स्प्लेंडर लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि जबरदस्त मायलेज
शेतकऱ्यांची केळीला 18.90 रुपये किलो भाव जाहीर करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

English Summary: Heavy rain in Maharashtra for 24 hours! 3 deaths Published on: 18 September 2022, 04:00 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश महादेव वाघ. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters