दहा जून रोजी मान्सूनचे राज्यात आगमन झाले व त्यानंतर मान्सूनने टप्प्याटप्प्याने आणि हळूहळू राज्य व्यापले. अजूनही राज्यातील मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे.
परंतु आता 18 जून पासून राज्यात जोरदार पावसाला सुरुवात होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. शनिवार पासून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मान्सून आगेकूच करणार असून या भागामध्ये अजून मान्सूनने हजेरी लावलेली नाही त्या भागांमध्ये देखील मान्सून पोहोचेल अशी अपेक्षा आहे.
मानसून हळूहळू पुढे सरकत असून राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस होताना दिसत आहे. परंतु अद्यापही बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस झाला नाही.
तसेच राज्याच्या मुंबई, ठाणे तसेच पालघर, वाशिम, सांगली, पुणे, यवतमाळ आणि बुलढाणा या जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे त्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत असून पेरणीपूर्व कामांना वेग आला आहे.
पावसाचे आगमन बऱ्याच ठिकाणी झाले आणि शेतकरी आनंदित झाले परंतु शेतकऱ्यांनी नक्की पेरणी कधी करावी असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.
याबाबत कृषी विद्यापीठाने कृषी तज्ज्ञांकडून सल्ला मिळाला आहे कि शंभर मिलिमीटर पाऊस पडेपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. दुबार पेरणीची अडचण होऊ नये यासाठी कृषी वैज्ञानिकांनी हा सल्ला दिला आहे.
आताची मान्सूनची स्थिती पाहता 18 जून दोन हजार बावीस पासून कोकण आणि लगतच्या घाट भागात पावसाचा वेग वाढण्याची अपेक्षा असून या कालावधीत या प्रदेशात या ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार सह व्यापक पर्जन्यवृष्टी अपेक्षित असल्याची माहिती हवामान विभागाने दिली.
अजूनही विदर्भ आणि मराठवाड्यात हवा तेवढा पाऊस नसल्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांमध्ये खरीप बद्दल चिंतेचे वातावरण आहे परंतु या दोन दिवसांमध्ये मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावणार आहे, अशा प्रकारचे चिन्हे आहेत.
Share your comments