IMD Alert : सध्या देशात सर्वत्र मान्सूनचा (Monsoon) धुमाकूळ सुरु आहे. अनेक भागात संततधार सुरूच आहे. तर काही भागात पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे लाखो हेक्टर वरील शेतीचे नुकसान झाले आहे. तर काही भागात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. येत्या काही तासात महाराष्ट्र (Maharashtra) आणि देशातील इतर राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, गुजरात, छत्तीसगड, गोवा, कोकण, मराठवाडा, विदर्भ, तेलंगणा, किनारपट्टी आणि उत्तर कर्नाटक, किनारपट्टी आंध्र प्रदेश, केरळसह अनेक राज्यांमध्ये 10 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो. या संदर्भात आयएमडी (IMD) अलर्टही जारी करण्यात आला आहे.
बाधित भागातील लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, हवामान खात्याने आज जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
कोथिंबीर करणार शेतकऱ्यांना मालामाल! पावसाळ्यात करा पेरणी आणि कमवा लाखो; जाणून घ्या कानमंत्र...
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबामुळे ओडिशा, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये आजपासून १० ऑगस्टपर्यंत चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या अलर्टमध्ये मच्छिमारांना 11 ऑगस्टपर्यंत समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जे आधीच खोल समुद्रात गेले आहेत त्यांना आज रात्रीपर्यंत परतण्यास सांगण्यात आले आहे. आजही दिल्ली-एनसीआरमध्ये पावसाची शक्यता आहे. एमआयडीनुसार दिल्लीतही पावसाचा अंदाज आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली-एनसीआरच्या विविध भागात पाऊस पडत आहे.
आजपासून पुढील दोन-तीन दिवस उत्तर प्रदेशातील अनेक भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने छत्तीसगड, गुजरात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि गोव्यात ९ ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे.
आयुष्यात पसरेल पैशाचा सुगंध! ही शेती करणार शेतकऱ्यांना श्रीमंत; करा खास पद्धतीचा अवलंब...
दुसरीकडे, 8 आणि 9 ऑगस्ट रोजी मध्य प्रदेश आणि सौराष्ट्रमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर छत्तीसगड आणि विदर्भात आज ते ९ ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याच वेळी, तेलंगणा, किनारपट्टी आणि उत्तर कर्नाटक, किनारी आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये 9 ऑगस्टपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
स्कायमेट वेदर (Skymet Weather) या खाजगी हवामानाचा अंदाज वर्तवणारी संस्था स्कायमेट वेदरचे हवामान शास्त्रज्ञ महेश पलावत यांच्या म्हणण्यानुसार, मान्सूनचा प्रवाह या दिवसांत मध्य भारतात पोहोचला आहे. त्यामुळे उत्तर भारतात सध्या पावसाची शक्यता कमी आहे.
महत्वाच्या बातम्या:
कमी गुंतवणुकीत व्हाल मालामाल! दुग्धव्यवसाय सुरु करून दरमहा करा लाखोंची कमाई
येत्या रब्बी हंगामात या पिकांची लागवड बनवणार मालामाल! जाणून घ्या...
Share your comments