उकाड्याने हैराण झालेले लोक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांची पेरणी लांबणीवर जात असल्याने चिंता व्यक्त केली आहे. आता मान्सूनबाबत खुशखबर आहे. कोकण किनारपट्टी आणि गुजरातला बिपरजॉयमुळे अलर्ट दिला होता. आता मान्सूनच्या वाटेत बिपरजॉयचा अडथळा नसल्याची माहिती मिळाली आहे. दक्षिण भारतात 18 जूनपासून मुसळधार पावसाला सुरुवात होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
‘बिपरजॉय’चक्रीवादळामुळे झालेल्या पावसानंतर गुजरातमधील मांडवीतील अनेक भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. IMD नुसार संपूर्ण महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर आणि सातारा येथे पावसाची शक्यता आहे.
पुढील आठवड्यात दक्षिण भारतात मुसळधार पावसाची शक्यता IMD ने वर्तवली आहे. हवामान खात्याच्या अहवालात पुढील आठवड्याच्या दुसऱ्या भागात केरळ, दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.
IMD ने राजस्थानच्या जैसलमेर, बारमेर, जालोर, सिरोही, उदयपूर, डुंगरपूर, चित्तोडगड, अजमेर, जयपूर आणि झुंझुनू जिल्ह्यांमध्ये पिवळा अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने सांगितले की, शनिवारी जोधपूर आणि उदयपूर विभागात चक्रीवादळ बिपरजॉयमुळे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मोठी बातमी! गावांमध्ये आता ‘एनए’ परवान्याची गरज नाही; गावठाणापासून २०० मीटर अंतरापर्यंतची अट
IMD ने कच्छ, जामनगर आणि देवभूमी द्वारका भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मोरबी, राजकोट, पोरबंदर आणि जुनागडमध्येही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर उर्वरित गुजरातमध्ये यलो अलर्ट आहे. पोरबंदर आणि राजकोटसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो.
Share your comments