Rain News Update :
हवामान खात्याने पुढील पाच दिवसांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे. त्यानुसार राज्याच्या काही भागात हलक्या पावसाने हजेरी लावली. मात्र जोरदार पाऊस झाला नाही.
हवामान विभागाने (दि.३१) रोजी मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात ठिकठिकाणी विजांसह हलक्या सरी पडतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. शुक्रवारपासून विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, मध्य महाराष्ट्रमधील काही भाग, नगर जिल्हा ,पश्चिम महाराष्ट्र मध्ये घाट माथ्यावर पावसाचा अंदाज आहे. सोलापूर, सांगली, सातारा, पुणे , धाराशिव तसेच पूर्व विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, आणि गोंदिया इथे पन गडगडाट सह पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, १ सप्टेंबरला दक्षिण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र, शनिवार आणि रविवारी दक्षिण मराठवाडा भागात धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस राहील.
Share your comments