अमरावती
राज्यातील पावसाने उघडीप दिली आहे. मात्र काही भागात हलका पाऊस अधूनमधून पडत आहे. मात्र पश्चिम विदर्भात अद्यापही दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे. विदर्भातील अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील अद्यापही चांगला पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी पावसाची प्रतिक्षा करत आहेत.
विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यातील ५ तालुक्यात अद्यापही पावसाने पुरेशी हजेरी लावली नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
बुलढाणा जिल्ह्याप्रमाणे अमरावती विभागातील अमरावती, अकोला, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यातही पावसाची विश्रांती आहे. त्यामुळे विदर्भात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची स्थिती आहे.
दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर, धारणी आणि अनजंगाव सुर्जी तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असल्याने शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये सरासरी इतका पाऊस झालेला असला तरीही काही ठिकाणी मात्र दुबार पेरणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.
Share your comments