पुणे
मागील आठवड्यापासून पावसाने विश्रांती दिली आहे. त्यामुळे शेतकरी आता पावसाची वाट पाहत आहेत. मात्र आणखी राज्यातील शेतकऱ्यांना सात दिवस पावसाची वाट पाहावी लागणार आहे. पुढील सात दिवसांत मध्य महाराष्ट्रसह पश्चिम आणि दक्षिण भारतात पावसाची शक्यता कमी आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
सध्या मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. तसंच मागील १० ते १२ दिवसांत देखील पावसाने कमी हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अधिक चिंता वाढली आहे. २५ ते ३१ ऑगस्ट दरम्यान विदर्भ, कोकण, मध्य प्रदेश, ओडीशा, छत्तीसगड, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात मोठ्या पावसाची शक्यता आहे.
अर्धा पावसाळा संपत आला तरी अद्याप मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अद्याप चांगल्या पावसाची प्रतिक्षा आहे. नांदेड वगळता मराठवाड्यात सातही जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला नाही. मागील ६० दिवसांत फक्त ३७.८ टक्के पाऊस झाला आहे. तर नांदेड वगळता एकाही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याचे चित्र आहे.
दरम्यान, मराठवाड्यातील नांदेड वगळता एकाही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे विभागातील प्रकल्पात फक्त ३६.८५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी हाच पाणीसाठा ७६.४० टक्के होता.
Share your comments