Weather Update : शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा कायम; हवामानात बदल
मान्सूनचा आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे पश्चिम टोक हिमालयाच्या पायथ्याकडे कायम आहे. पूर्व टोक गोरखपूर, दरभंगा, बालूरघाट ते मणिपूरपर्यंत सक्रिय आहे.
राज्याच्या अनेक भागात अद्यापही पावसाची विश्रांती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा कायम आहे. आज (ता.२८) कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
राज्यात ढगाळ वातावरण कायम आहे. त्यामुळे ऊन-सावल्यांचा खेळ सुरु आहे. तर अधूनमधून राज्यात पावसाच्या सरी पडत आहेत. पावसाची उघडीप असलेल्या भागांत उन्हाचा ताप वाढला आहे.
आज (ता. २८) कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
English Summary: Farmers still waiting for rain Change in climate Weather UpdatePublished on: 28 August 2023, 10:42 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments