Monsoon update news
Rain Update News : देशातून परतीच्या मान्सूनचा प्रवास बहुतांश राज्यातून माघारी फिरला आहे. मात्र अद्यापही काही भागात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. राज्यातून देखील मान्सून माघार घेतली आहे. त्यामुळे ऑक्टोबर हिटचा तडका जाणवू लागला आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, मेघालयसह सिक्कीमध्ये अतिवृष्टी झाली असून पुढील २४ तासांतही या भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यातून मान्सून माघारी फिरला असताना अद्यापही अधूनमधून पावसाची हजेरी सुरु आहे. येत्या २४ तासांतही विविध भागात हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
येत्या ३ दिवसांत कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्रातून मान्सून माघार घेण्याची शक्यता आहे. तसंच बिहार, झारखंड, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या काही भागांतून मान्सून माघारी फिरवण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.
देशातून परतीच्या मान्सूनचा प्रवास सुरु आहे. राज्याच्या बहुतांश भागातून देखील मान्सूनने माघार घेतली आहे. त्यामुळे राज्यात ऑक्टोबर हिटचा तडका जाणवू लागला आहे. यामुळे लवकरच मॉन्सून राज्यासह संपूर्ण देशातून परतण्याची शक्यता आहे.
राज्यातून मान्सून बऱ्यापैकी माघारल घेतली असल्यामुळे हवामान कोरडे झाले आहे. यामुळे तापमानाचा चटका वाढला आहे. तसंच राज्याच्या बहुतांश तापमानाने ३५ अंशाचा पारा पार केला आहे. तसंच आगामी काळात तापमानात वाढ होऊ शकते, असा अंदाजही हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
Share your comments