आपल्याला सगळ्यांना 'ऑक्टोबर हीट'हा शब्द माहिती आहे.मागील काही वर्षांपासून ऑक्टोबर महिन्यामध्ये जाणवणारी उष्णता ही उन्हाळ्याची जाणीव प्रकर्षाने करुन देत असते. या ऑक्टोबर हीटचा परिणाम शेतीवर देखील मोठ्या प्रमाणावर होतो. पिकांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना खूप व्यवस्थित नियोजन यामुळे करावे लागते. गेल्या काही वर्षांपासून हवामानामध्ये अचानक काही वेगळ्या पद्धतीचे बदल होत असून त्यामुळे कुठे जास्त पाऊस तर कुठे पाऊसच नाही अशी देखील परिस्थिती बघायला मिळते.
हिवाळ्यात देखील उन्हाळ्यासारखी परिस्थिती जाणवते तर उन्हाळ्यातदेखील रात्री थंडी जाणवते, हे सगळे ऋतूचक्रामध्ये जे काही फेरफार होताना दिसत आहेत यामागे विविध प्रकारच्या हवामानातील बदल किंवा इतर भौगोलिक कारणे कारणीभूत आहेत.
जर आपण मुंबई किंवा संपूर्ण कोकण व मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्हा सोडून सर्व जिल्ह्यात त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर,पुणे, सातारा, सोलापूर आणि विदर्भातील यवतमाळ, गडचिरोली, वर्धा, चंद्रपुर इत्यादी ठिकाणी सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त म्हणजेच 109 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
परंतु असे असतानादेखील सप्टेंबर मध्ये जे काही कमाल तापमान आहे ते अधिक असेल असा अंदाज आहे. त्यासोबतच संपूर्ण खानदेश पट्टा, अहमदनगर, सांगली, नागपूर तसेच गोंदिया व भंडारा हे जिल्हे व उत्तर औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर ते सिल्लोड पर्यंत आणि दक्षिण नाशिक व सिन्नर,निफाड,येवला आणि नांदगाव इत्यादी तालुक्यात देखील सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे.
तसेच या महिन्यांमध्ये पूर्व विदर्भ जर वगळला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुपारी तीन वाजेपर्यंतचे कमाल तापमान हे सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता 80 टक्क्यांपर्यंत आहे. एवढेच नाही तर पहाटे पाच वाजेपर्यंत किमान तापमान सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता 40 टक्क्यांपर्यंत आहे.
नक्की वाचा:IMD Alert: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय; या भागात यलो अलर्ट
Share your comments