1. हवामान

Rain Update : राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस सुरु होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. याचबरोबर विदर्भात आणि मराठवाड्याच्या काही भागात जोरदार पावसाचा यलो अलर्टही हवामान खात्याने दिला आहे.

Rain News

Rain News

पुणे

मागील तीन आठवड्यापासून राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकरी पावसाची वाट पाहत आहे. तर पेरणी केलेली पीके पाण्याअभावी जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहेत. पण आता राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होतंय. त्यामुळे उद्यापासून राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस सुरु होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. याचबरोबर विदर्भात आणि मराठवाड्याच्या काही भागात जोरदार पावसाचा यलो अलर्टही हवामान खात्याने दिला आहे.विदर्भात उद्या येलो अलर्ट आहे.

दरम्यान, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये काही ठिाकणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज आहे.

English Summary: Chances of increased rainfall in the state Weather forecast Published on: 17 August 2023, 04:49 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters